आज मंत्रालयासमोर कॉंग्रेेस भजी पकोडे स्टॉल उभारणार
मुंबई :  तरुणांनी बेरोजगार राहण्यापेक्षा भजी (पकोडे) विकणे चांगले असे विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी  राज्यसभेत केल्याने त्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने उद्या गुरुवार ८ फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता मंत्रालयावर भजी-पकोडे स्टॉल उभारण्यात येणार आहे. हे बेरोजगार तरुण आपल्या पदवी प्रमाणपत्राची झेरॉक्स सुद्धा आपल्या सोबत घेऊन येणार आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम हे नेतृत्व करणार आहेत. तरुणांनी भजी (पकोडे) विकण्याचे स्टॉल सुरु करावेत असे आवाहन निरुपम यांनी केलय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!