भाजपला विदर्भात हादरा, नाना पाटोले काँग्रेसच्या वाटेवर ?
खासदारकीचा तडकाफडकी दिला राजीनामा
नागपूर : भंडारा-गोंदियाचे भाजपचे खासदार नाना पाटोले यांनी आज खासदारकीचा आणि भाजपचा राजीनामा दिला. नानाच्या राजीनाम्यामुळे विदर्भात भाजपला हादरा बसलाय. काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची भेटही घेतली होती. लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झालीय.
नाना पटोले यांनी आपला राजीनामा लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे सोपवला. नांना पाटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली होती शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.त्यामुळे पाटोले नेहमीच चर्चेत राहिले होते. नानाच्या भाजप विरोधी पवित्र्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नानांना आपल्यासोबत येण्याची ऑफरच दिली होती. काही दिवसांपूर्वी नानांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती या सगळ्या पर्शवभूमीवर नाना स्वगृही परतण्याची चर्चा सुरू झालीय.