मुख्यमंत्रयाना ‘भय्याभूषण’ द्या,  मनसेची जहरी टीका
मनसे विरूध्द फडणवीस सामना रंगणार

मुंबई : एकिकडे मनसेने उत्तरभारतीयांविरोधात दंड थोपटले असतानाच दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “मुंबईतील उत्तर भारतीय तसेच वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक हे मुंबईला महान बनवतात. त्यांनी मुंबईचा गौरव आणखी वाढवला आहे असे उद्गगार काढल्याने मनसे संतप्त झालीय. मुख्यमंत्रयांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळू शकत नाही पण ‘भय्याभूषण’ पुरस्कार मिळावा, अशा शब्दात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागलीय त्यामुळे येत्या काही दिवसात मनसे विरूध्द फडणवीस सामना रंगण्याची शक्यता आहे.
मुंबईतल्या घाटकोपरमध्ये शिक्षण महर्षी आय डी सिंह यांच्या नावाने उभारलेल्या चौकाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी मुख्यमंत्रयानी हे वक्तव्य केल होत. भाषा हे संपर्काचे साधन असून, माणसाला जोडते त्यामुळे भाषा हे विवादाचं माध्यम होऊ शकत नाही. हा वाद निर्माण करणं चुकीचे आहे. मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करु नये असा टोलाही मुख्यमंत्रयानी मनसेनेला लगावला होता. मुख्यमंत्रयाच्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक बनलीय. मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा असावा कोणत्याही भाषेचा नाही. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांच्या राजकारणासाठी मुख्यमंत्र्यांकडून अशी वक्तव्य केली जात असल्याचा आरोप देशपांडे यांनी केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *