मनसेच्या भव्य रोजगार मेळाव्यात ३०० तरुणांना मिळाला रोजगार

डोंबिवली :-  ( शंकर जाधव ) :  राज्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढत  आहे. त्यामुळं तरुणांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकर घेतलाय. डोंबिवली पश्चिमेकडील जोंधळे विद्यालयात आयोजित केलेल्या भव्य रोजगार मेळाव्यात तब्बल ३०० तरुणांना रोजगार देण्यात आला. यावेळी परिवहन समितीचे सदस्य प्रल्हाद म्हात्रे, रोजगार स्वंयरोजगार विभाग शहर अध्यक्ष दिलीप म्हात्रे, विभाग अध्यक्ष वेद पांडे,ओम लोके, सुभाष कदम, केतन सावंत , समीर पालांडे, विजय शिंदे, स्मिता भणगे आदी मान्यवर उपस्थित होते.रोजगार मेळाव्यात सकाळपासून अनेक बेरोजगार तरुणांनी गर्दी केली होती.यावेळी आलेल्या नामांकित कंपन्यानी तरुणांच्या मुलाखती घेऊन त्याच्या ठिकाणी त्यांना नियुक्तीपत्र दिले. विधी व जनहित कक्ष उपाध्यक्ष राहुल गणपुले म्हणाले, अनेक बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे असे राज ठाकरे यांची म्हणणे आहे. त्यानुसार डोंबिवलीत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!