कल्याण : सकल मराठा समाजाच्या वतीने विजयादशमीच्या निमित्ताने कल्याण शहरात पारंपरिक पद्धतीने सोनं लुटण्याचा कार्यक्रम मंगळवारी सकाळी पार पडला.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, कल्याण पश्चिम येथे संपन्न झालेल्या सदर कार्यक्रमाची सुरुवात आदिशक्ती तुळजाभवानीचे स्मरण करीत करण्यात आली. प्रथम मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते दिनेश तावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तदनंतर पारंपरिक पद्धतीने सोनं लुटण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी ॲड. धनंजय जोगदंड, सुभाष गायकवाड, प्रसिद्ध नाट्य कलावंत शिवाजी शिंदे, प्रख्यात मेकअप आर्टिस्ट रविंद्र कदम, उद्योजक सोमनाथ सावंत, अंकूश मुळीक, शरद बिरामणे, सतीश पेडणेकर, रवि लांडे, अशोक लहाने, किशोर दुबे आदींसह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी मराठा समाजाच्या वतीने विजयादशमीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *