पडघे गावात जिजाई महिला मंडळाची स्थापना
पडघे : राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पडघे गाव हावरे सोसायटी येथे जिजाई महिला मंडळाची स्थापना केलीय. पडघे गावातील रहिवासी मनिषा सोनावणे, प्रिती गांगुर्डे, भाग्यश्री खेडकर, शलाका तावडे, वनिता चव्हाण, विजया शिंदे, अंजना राठोड, दिपाली शिंदे, वर्षा चवरे, नयना तायडे, महिमा यादव, प्राची गांगुर्डे या महिलांनी एकत्रीत येऊन जिजाऊ महिला मंडळाची स्थापना केलीय. मंडळाच्यावतीने महिलांच्या विकासासाठी काम केले जाणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल कांबळे यांच्या पुढाकाराने या महिला मंडळाची स्थापना करण्यात आलीय.