मुंबई दि.१० (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद हि राज्यातील ४ लाख ३० हजारहुन अधिक रजिस्टर्ड फार्मासिस्ट (नोदणीकृत औषध व्यवसासी) यांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. या परिषदेच्या वतीने फार्मासिस्टला अत्याधुनिकते कडे नेण्यासाठी अद्‌ययावत नुतनीकृत कार्यालय निर्माण केले आहे. या वास्तूचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवार १३ ऑगस्ट २०२४ रोजी १० वाजता करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार कॅबिनेट मंत्री हसनजी मुश्रीफ , अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम , अन्न व औषध विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, फार्मसी कौन्सील ऑफ इंडिया, नवी दिल्ली अध्यक्ष डॉ. मोंटू कुमार पटेल, अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष अतुल अहिरे , उपाध्यक्ष धनंजय जोशी व निबंधक सायली मशाल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद ही महाराष्ट्र शासनाने गठीत केलेली स्वायत्त संस्था आहे. फार्मासिस्ट म्हणून अर्जदारांना रजिस्ट्रेशन देणे हे परिषदेचे मूलभूत कार्य आहे. परिषेदेने फार्मासिस्टच्या हितासाठी त्याना औषध विषयक अद्‌ययावत ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी स्वनिधीतून निर्माण केलेल्या औषध माहिती केंद्राच्या मदतीने निरंतर शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत उजळणी पाठ्यक्रम कॉन्सिलिंग कोर्स निर्माण केले. फार्मासिस्टला तांत्रिक ज्ञान व कौशल्ये यांनी स्वयंपूर्ण करण्याच्या हेतूने जगन्नाथ शिंदे (कार्यकारी समिती सदस्य) यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिकतेची कास धरुन ५५०० स्क्वेअर फुट स्वमालकीचे कार्यालय खरेदी करून त्याचे नुतनीकरण पूर्ण केले. यामध्ये औषध माहिती केंद्रासाठी स्वतंत्र दालन. १०० फार्मासिस्टला जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणारे परस्परसंवादी स्क्रीन (Interactive Screen )असलेने आधुनिक सभागृह कॉन्फरन्स हॉल तयार करण्यात आले आहे. या सर्व सोयीनी सज्ज असलेल्या कार्यालयाचे उद्‌घाटन मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी दहा वाजता परिषद कार्यालय आर स्क्वेअर लालबहादूर शास्त्री मार्ग मुलुंड पश्चिम येथे करण्यात येणार आहे.

आज पर्यत परिषदेने २५ हजार पेक्षा जास्त फार्मासिस्टला “उजळणी पाठयक्रम, कौन्सिलिंग कोर्सच्या ” माध्यमातून प्रशिक्षित केले आहे.काळाची पाऊले ओळखून ‘ऑनलाइन’ शैक्षणिक पाठ्यक्रमांची निर्मिती केली व परिषदेच्या संकेतस्थळावर ज्ञान अद्‌यावत करण्यासाठी LMS( Learming Management System) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा ६ हजार पेक्षा अधिक फार्मासिस्टने लाभ घेतला. राज्यात महिला फार्मासिस्टकरिता करता ‘उंच माझी भरारी ‘हा सुप्त गुण जागृत करण्यासाठी कार्यक्रम देखील सुरु करण्यात आला आहे. हॉस्पिटल फार्मसी, उत्पादन क्षेत्रात काम करणा-या फार्मासिस्टसाठी प्रथमच ‘सेड्युल एम” या कार्यशाळाचे देखील आयोजित करण्यात आले होते.

उदघाटन सोहळ्यानंतर महाकवी कालिदास नाट्यगृह मुलुंड येथे मार्गदर्शक व सत्कार समारंभ सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून अंदाजे २००० फार्मासिस्ट ,या क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्व माजी परिषद सदस्यांचा सत्कार,स्मरनिका प्रकाशन डॉ.राजेन्द्र प्रताप गुप्ता यांचे फार्मासिस्ट ला तंत्रज्ञान युगासाठी फार्मासिस्ट ची सज्जता ” या विषयावर मार्गदर्शन सत्र होणार आहे. एकंदरीत कार्यालयाचा चेहरा मोहरा नुसता वरून बदलला नसून अंतबाह्य बदल करून पंजिकृत औषध व्यवसायीसाठी नवनवीन योजना राबवून त्यांच्या व्यावसायिक कौशल्ये वृद्धिगत करण्यासाठी परिषद प्रयत्नशील असणार आहे. म्हणून परिषदेने एकमताने “नाविन्याचा आहे ध्यास फार्मसीचे उन्नती हाच आमचा प्रयास” असे ठरविले आहे. नूतनीकृत कार्यालयाला भेट द्यावी असे आवाहन कॉन्सिलचे अध्यक्ष अतुल अहिरे , उपाध्यक्ष धनंजय जोशी तसेच निबंधक सायली मशाल यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!