अवघ्या पाच वर्षाच्या खुशीचे बॉलीवूडनंतर आता टॉलीवूड आणि कॉलीवूडमध्येही पर्दापण

कर्जतचे नाव चंदेरी दुनियात झळकले

कर्जत (राहुल देशमुख ) : अवघे पाच वर्ष वय, बालवयातच जाहिरातीत चमक मिळवणा-या खुशी हजारे हिने हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीत आपला ठसा उमटवला असतानच आता तिने टॉलीवूड आणि कॉलीवूडपर्यंत झेप घेतलीय. द हाऊस नेक्स्ट डोअर या तिच्या नवीन हॉरर चित्रपटाचे नाव आहे. अवल हा तमिळ भाषेत तर ग्रुहम हा तेलुगुभाषेत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. खुशीच्या कामगिरीमुळे कर्जतचे नाव चंदेरी दुनियात झळकले आहे.

कर्जत गावात राहणारी खुशी हजारे ही अवघ्या दीड वर्षाची असतानाच पाम्पर्सच्या जाहिरातीत पहिल्यांदा झळकली. तब्बल दीड हजार मुलांमधून तिची निवड झाली होती. तसेच गोल्डी गुलाब जामून, येस बँक, गुड नाईट, बिग बझार, मोम & मी, डी-मार्ट, कुकुंबर, डी एच एफ एल, संतूर, एस. बी. आय., महा सिमेंट, फ्रान्क्लीन टेम्पलटन, अश्या अनेक जाहिराती मधून ती झळकत आहे. छोटयाशा खुशीने जाहिरातीतून अनेकांची मने जिंकल्यानंतर सिने अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सोबत सरबजीत या हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्याची सुवर्ण संधी तिला मिळाली. पटकावली. या चित्रपटाची निवड ऑस्कर्स पुरस्कारासाठी झाली होती. खुशी वजनदार चित्रपटातून सई ताम्हणकर, प्रिया बापट यांच्या सोबत झळकली. चिमुकलीने आपल्या कामाची विशिष्ट छबी उमटवली. चिमुकल्या ख़ुशीने बॉलीवूडनंतर tollywood आणि kollywood या चित्रपट सृष्टी झेप घेतलीय. The House Next Door तिच्या नवीन हॉरर चित्रपटाचे नाव असून हा हिंदीत आहे. तर Aval तामीळमध्ये, Gruham तेलुगु मध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून सिद्धार्थ, अतुल कुलकर्णी, अॅन्ड्रीया जेरेमिया या दिग्गज कलाकारांसोबत खुशी झळकणार आहे. या चित्रपटात खुशीने अतुल कुलकर्णींच्या धाकट्या मुलीची ( सारा ) ची भूमिका साकारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *