प्रभाग अधिकारी श्वेता सिंघासने यांचा डेंग्यूने मृत्यु
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग अधिकारी श्वेता सिंघासने यांचा डेंग्यूच्या आजाराने दुर्देवी मृत्यू झाला आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय अवघे 53 वर्षे होते. श्वेता सिंघासने या अंबरनाथला रहात होत्या. आजारी असल्याने बुधवारी त्यांना कल्याणच्या फोर्टीज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांनी एक वर्ष डोंबिवलीच्या फ प्रभागात अधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्या महापालिका मुख्यालयात लेखा शाखेत त्या सेवेत होत्या. शनिवारी त्यांच्या राहत्या घरी अंत्यविधी पार पडला.