असिफासाठी देशवासिय एकवटले, नराधमांना फाशी देण्याची मागणी 

ट्वीटरवरुन दिग्गजांनी तीव्र प्रतिक्रिया

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये 8 वर्षीय असिफावर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देशभरातून होत आहे. चित्रपट आणि क्रिडा क्षेत्रासह अनेक दिग्गजांनी ट्वीटरवरुन तीव्र संताप व्यक्त केलाय.

काय झाल त्या दिवशी
१० जानेवारीला असिफा ही बकऱ्या चारण्यासाठी जंगलात गेली होती. त्या दिवसापासून ती बेपत्ता झाली. १२ जानेवारीला तिचे वडील महंमद युसूफ यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये नोंदविली. १७ जानेवारीला जंगलात तिचा मृतदेह आढळून आला. तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर पाच दिवस अत्याचार करण्यात आले.

तसेच उनाव येथेही तरूणीवर एका आमदाराने अत्याचार केला तसेच तिच्या वडीलांना मारहाण करण्यात आली त्या मारहाणीत तिच्या वडीलांचा मृत्यू झाला. कठुआ आणि उनावचे तीव्र पडसाद देशभरात उमटले आहेत. पिडीतांना न्याय मिळावा व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देशभरातून होत आहे.

भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला अटक
उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात आरोपी असलेला भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला सीबीआयच्या पथकाने अटक केलीय.  लखनौच्या इंदिरा नगर भागातील राहत्या घरातून ही अटक करण्यात आली. पॉक्सो कायद्याअंतर्गतही त्याच्याविरोधात केस दाखल करण्यात आली आहे. सध्या त्याची रवानगी सीबीआयच्या लखनौतील मुख्यालयात करण्यात आली आहे.

मोदीजी तुम्ही गप्प का ? राहुल गांधीचा सवाल
कठुआ आणि उन्नाव येथे झालेल्या बलात्कार प्रकरणाने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर जोरदार हल्ला चढविलाय. मोदीजी तुम्ही गप्प का आहात ? तुमचं मौन राहणं आम्हाला आवडलेलं नाही. बलात्कारी आणि मारेकऱ्यांना राज्यसरकारे पाठिशी का घालत आहेत? असा संतप्त सवाल राहुल गांधी यांनी ट्विट करून नरेंद्र मोदी यांना केलाय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!