कल्याण : बांग्लादेशातील ढाका येथे नुकत्याच झालेल्या मध्य दक्षिण आशियाई ऑर्टीस्टक जिम्नॅस्टीक चॅम्पीयन स्पर्धेत कल्याणच्या ओंकार ईश्वर शिंदेने अतिशय चमकदार कामगिरी करत कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ओंकारने या स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य आणि कास्य पदक जिंकले आहे.


ओंकारने टीम इंडियासाठी सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली आहेत. तो 4 वर्षाचा असल्यापासून जिम्नॅस्टीकचे प्रशिक्षण घेत होता. त्याने भाईर जिमखाना डोंबिवली येथून जिम्नॅस्टीकची सुरुवात कली. त्याचा मोठा भाऊ अभिजीत हा देखील आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्ट आणि पदक विजेता देखील आहे. शिंदे कुटुंबियांनी तयार केलेल्या आकार जिम्नॅस्टीक्समध्ये अभिजीत हा ओंकारला 2017 पासून प्रशिक्षण देत आहे. आकार जिम्नॅस्टिक्स हे भारतातील एकमेव जागतिक दर्जाचे जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्र आहे.


सेंट्रल साउथ एशियन आर्टिस्टक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपसाठी खेळाडूंची निवड 14 आणि 15 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे झाली. जिथे संपूर्ण भारतातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. विशेष म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, रेल्वे, पोलीस आणि इतर राज्यांतील सर्व वरिष्ठ जिम्नॅस्ट्समधून ओंकारची निवड झाली. ढाका, बांगलादेश येथे नुकत्याच झालेल्या उझबेकिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका इतर मध्य दक्षिण आशियाई देशांच्या स्पर्धेत ओंकारने भारतासाठी 4 पदके जिंकली असून भारताच्या संघासाठी सर्वाधिक पदके जजिंकणारा ओंकार हा एकमेव जिम्नॅस्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!