कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघाचा सुपरस्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत इतिहास रचला आहे. बुमराहनेऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी करत आपल्या कसोटी कारकिर्दीत 200 बळी पूर्ण केले आहेत.
बुमराहने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा अव्वल फॉर्म फलंदाज ट्रॅव्हिस हेडला बाद करून ही खास कामगिरी केली आहे. कसोटीत 20 पेक्षा कमी सरासरीने 200 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा बुमराह हा जगातील पहिला गोलंदाज आहे.
जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियात आपली विध्वंसक गोलंदाजीची शैली कायम ठेवली आहे.बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात दुसरी विकेट घेत या फॉरमॅटमधील विकेट्सचे द्विशतक पूर्ण केले.
बुमराहने चौथ्या कसोटी सामन्यात अवघ्या 11 चेंडूत तीन विकेट्स घेत ज्या गतीने विकेट्स घेतल्या, त्यातून सावरणे ऑस्ट्रेलिया अवघड झाले आहे. बुमराहने कांगारूंच्या दुसऱ्या डावात आतापर्यंत चार विकेट्स घेतल्या आहेत. या सामन्याच्या पहिल्या डावातही त्याने 4 विकेट घेतल्या होत्या. अशाप्रकारे या सामन्यात त्याच्या नावावर एकूण 8 विकेट्स जमा झाल्या आहेत.हेड त्याचा 200 वा बळी ठरला.
यासह तो सर्वात कमी सरासरी आणि सर्वात कमी चेंडूत 200 बळी घेण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर येऊन विक्रम नोंदवला आहे.200 विकेट्स घेण्यात बुमराहची सरासरी सर्वात कमी आहे.
200 किंवा त्याहून अधिक विकेट घेतलेल्या जगातील कोणत्याही गोलंदाजाने 20 पेक्षा कमी सरासरीने विकेट घेतलेल्या नाहीत. जसप्रीत बुमराह हा जगातील पहिला असा गोलंदाज ठरला आहे. 200 विकेट्स घेण्यात बुमराहची सरासरी सर्वात कमी आहे. त्याने माल्कम मार्शलच्या 20.94 च्या सरासरीला मागे टाकून 19.38 च्या सरासरीने 202 विकेट्स घेतल्या आहेत.
बुमराहने 3912 धावा देत 200 विकेट्सचा टप्पा गाठला आहे. 20 पेक्षा कमी सरासरीने 200 बळी घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज आहे.
बुमराहने 200 विकेट्स पूर्ण करण्यासाठी 8448 चेंडूत टाकले. सर्वात कमी चेंडूंमध्ये हा टप्पा गठणारा तो चौथा गोलंदाज ठरला आहे. या यादीत पाकिस्तानचा वकार युनूस अव्वल आहे, त्याने 7725 चेंडूत 200 विकेट घेतल्या आहेत.
दुसऱ्या आणि तिस-या स्थानावर अनुक्रमे दक्षिण आफ्रिकेचे डेल स्टेन (7848 चेंडू) आणि कागिसो रबाडा (8153 चेंडू) आहेत.