जनशताब्दी’चे इंजिन फेल :आसनगाव – कसारा वाहतूक ठप्प
# एस टी प्रशासनाकडून जादा नाशिक बसेस

कसारा (सचिन राऊत) – मुंबईहून नाशिकच्या दिशेने औरंगाबादकडे निघालेल्या जनशताब्दी एक्स्प्रेसचे इंजिन शनिवारी दुपारी आसनगाव व आटगाव स्थानकादरम्यान बंद पडले. त्यामुळे सुमारे सव्वातास मध्य रेल्वेची कसाऱ्याकडे जाणारी जलद सेवा बंद पडली.या गोंधळामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला.

डाउन मार्गावरील मुंबई-औरंगाबाद जनशताब्दी एक्स्प्रेस दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास आसनगाव-आटगाव स्थानकाच्या दरम्यान आली आणि एक्स्प्रेसचे इंजिन पुंदाफाट्याच्या आसपास बंद पडले.

त्यामुळे या एक्स्प्रेसच्या मागे असलेली एक कसारा लोकलसह मनमाड-गोदावरी,सोलापूर-भुसावळ व मुंबई नागपुर सेवाग्राम या तीन एक्सप्रेस गाड्या खोळंबल्या. तर त्यामागील रद्द करण्यात आलेली कसारा लोकल आसनगाव स्थानकातून ५:३७ ला ठाणे करुन सोडण्यात आली.यावेळी नाशिककडे निघालेल्या प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या शहापुर आगारातून नाशिकसाठी दोन बस सोडण्यात आल्या.रेल्वे प्रशासनाने कसाऱ्याहून अतिरिक्त इंजिन मागवून पाचच्या सुमारास वाहतूक पूर्ववत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!