मुंबई : गेल्या देान दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कंपन्या कार्यालये आणि त्यांच्या बहिणींच्या घरांवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सुध्दा भाजप विरोधात आक्रमक झाले आहेत . आयकर विभागाच्या धाडसत्रावरून राज्यातील राजकारण चांगलचं तापल्याचे दिसून येत आहे.. इन्कटॅक्सच्या छापेमारीवरून राष्ट्रवादी विरूध्द भाजप असा सामना रंगल्याचे पाहावयास मिळत आहे.
.

भाजपकडून सत्तेचा गैरवापर :  शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणावरून भाजपवर टीका केलीय.  सोलापूर येथे कार्यकत्यांना संबोधताना पवार म्हणाले की,  “अजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मलाही ईडीची नोटीस पाठवली होती. ज्या बँकेचा मी सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली. मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवलं. सत्तेचा गैरवापर आजचे राजकर्ते करत आहेत. जनता यांना धडा शिकवेल, असं शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही – सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे हे आज ठाण्यात आल्या होत्या. आयकर विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईवर त्यांनी प्रतिक्रिया दिलीय.   संघर्ष करणे ही पवारांची खासियत आहे. दिल्लीने कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्ली पुढे झुकणार नाही आणि झुकला ही नाही. सुडाचे राजकारण आम्ही कधीही केले नाही आणि कधीही करणार नाही.

 “पाहुणे आलेत, ते गेल्यावर बोलेन : अजित पवार 
पुण्यात अजित पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी We Support Ajit Dada असे फलक हातात घेऊन केंद्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. आयकर विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईवर अजित पवार म्हणाले, “पाहुणे वेगवेगळ्या घरात आहेत त्यांचं काम चालू आहे ते गेल्यावर मला काय बोलायचं आहे ते मी बोलेन. ते गेल्यावर मला काय भूमिका मांडायची आहे ती मांडेन. नियमाने जे असेल ते जनतेच्या समोर येईन त्यात घाबरायचं काय कारण” अस पवार म्हणाले.

भाजपाशी संबंध जोडणे हास्यास्पद : चंद्रकांतदादा पाटील

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या घरे किंवा कार्यालयांवर आयकर खात्याने टाकलेल्या छाप्यांचा संबंध भारतीय जनता पार्टीशी जोडणे हास्यास्पद आहे. लखीमपूर खिरी प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेमुळे हे छापे मारण्यात आल्याचा दावा म्हणजे मोठाच विनोद आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. आयकर विभाग ही स्वतंत्र केंद्रीय यंत्रणा आहे. ती तिच्या पद्धतीने कायद्याच्या चौकटीत काम करत असते. आयकर विभागाने काही आर्थिक व्यवहार उघडकीस आणले तर त्याला कायदेशीर पद्धतीनेच उत्तर दिले पाहिजे. अशा छाप्यांचा संबंध भारतीय जनता पार्टीशी जोडून राजकीय रंग देणे आणि त्या आधारे स्वतःला निर्दोष ठरविण्याचा प्रयत्न करणे हास्यास्पद आहे असे पाटील म्हणाले.

कर नाही त्याला डर कसली ?
अजित पवार, पार्थ पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाने छापसत्र सुरू आहे. मात्र कर नाही त्याला डर कसली ? असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. आयकर विभागाच्या धाडसत्रानंतर त्यातून जी माहिती येईल त्या आरोपांना उत्तर द्या, अनिल देशमुखांसारखे फरार होऊ नका अशी टीका भातखळकर यांनी केलीय.

घोटाळेबाजांना सजा होणारच : किरीट सोमयया
भाजपचे नेते किरीट सोमयया यांनीही या प्रकरणावरून पवार कुटूंबियांवर टीका केलीय. पवार परिवार कितीही पॉवरफुल्ल समजत असले तरी महाराष्ट्राची जनता पावरफुल्ल आहे. घोटाळेबाजांना सजा होणारच असे सोमयया म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!