लष्कराकडून पहिल्यांदाच होणार पुलांचे बांधकाम 

एल्फिन्स्टन, करीरोड आणि आंबिवली पुलाची करणार उभारणी 

मुंबई : एलफिन्स्टन रोड रेल्वे स्टेशन येथे बांधण्यात येणाऱ्या नवीन पादचारी पुलाच्या (फूट ओव्हर ब्रीज) जागेची पाहणी आज केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामनरेल्वेमंत्री पियुष गोयलमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. एल्फिन्स्टन पुलासह करी रोड रेल्वे स्टेशन आणि अंबिवली रेल्वे स्टेशन येथील पादचारी पुलांची बांधणी लष्करामार्फत  करण्यात येणार असून,  नागरी कारणासाठी लष्कराकडून बांधकाम होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही  सीतारामन  यांनी सांगितलं. 

सीतारामन म्हणाल्यासैन्यदलाकडून लष्करी कारणासाठी तसेच आपत्‍ती काळामध्ये अशी बांधकामे होत असतात. मात्र एलफिन्स्टन येथे झालेली दुर्घटना अत्यंत मोठी होती. मुंबईत देशातील अनेक भागातील नागरिक कामानिमित्त राहतात. या दुर्घटनेत अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे  महाराष्ट्र सरकारने संरक्षण मंत्रालयाकडे केलेली विनंती लक्षात घेऊन लष्कराने हे काम करावे असे ठरविण्यात आले आहे. 31 जानेवारी 2018  हे काम पूर्ण  करण्यात येणार असल्याची घोषणा  संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. एलफिन्स्टन रोड रेल्वे स्टेशन येथे झालेली दुर्घटना अत्यंत दुर्देवी होतीअसे सांगून मुख्यमंत्री म्हणालेअशी दुर्घटना पुन्हा होऊ नये म्हणून राज्य शासनाकडून उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. नेहमीच्या कार्यपद्धतीने येथे नवीन पुल बांधावयाचे काम हाती घेतले असते तर त्यास खूप कालावधी जातो. मात्र भारतीय सेनेकडे अशा प्रकारचे काम कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचे कौशल्य असल्याने संरक्षण मंत्रालयाकडे हे काम करण्याची विनंती करण्यात आली. संरक्षण मंत्रालयाने ही विनंती मान्य केली. याअंतर्गत एलफिन्स्टन रोड येथील पुलासोबतच करी रोड रेल्वे स्टेशन आणि अंबिवली रेल्वे स्टेशन येथील पादचारी पुलांचे कामही लष्कराकडून केले जाणार आहे.  रेल्वेमंत्री पियुष गोयल म्हणाले कीएलफिन्स्टन येथील दुर्घटनेनंतर रेल्वेकडून उपनगरीय रेल्वे स्थानकांची पाहणी करुन सुरक्षाविषयक पाहणी केली. त्यानुसार कोणत्या उपाययोजना करता येतील तसेच आवश्यक सुधारणांबाबत अहवाल तयार करण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयाकडे तीन रेल्वे स्टेशन वरील पादचारी पुलांचे काम हाती घेण्याची विनंती केली. लष्कर देशाच्या संरक्षणासाठी सतत तत्पर असतेच मात्र हे पुलांच्या कामानिमित्ताने राष्ट्रबांधणीचे काम हाती घेऊन एक नवीन आदर्श घालून दिला आहेअसेही ते म्हणाले. याप्रसंगी शिक्षणमंत्री विनोद तावडेआमदार आशिष शेलारराज पुरोहितलष्कराचे महाराष्ट्रगोवा आणि गुजरातचे जनरल ऑफ कमांड जनरल विश्वम्बरपश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्तामध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आदी उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *