दुबई : संपूर्ण जगाचे लक्ष वेधलेल्या भारत विरूध्द पाकिस्तान टी-२० वर्ल्डकप २०२१ सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्ताने भारतावर पहिल्यांदाच मात करीत नवा इतिहास रचला.

दुबईच्या मैदानावर रंगलेल्या या सामन्याची उत्सुकता सगळयांना लागली होती. संध्याकाळी ७ वाजता पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा, केएल राहुल हे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने ५७ धावा केल्या तर रिषभ पंतने ३९ धावांचे योगदान दिले. भारताने २० षटकात ७ बाद १५१ धावा करत पाकिस्तानसमोर १५२ धावांचे आव्हान ठेवले.

बाबर, रिझवानची नाबाद खेळी …
कर्णधार बाबर आझमने ५२ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ६८ धावांची खेळी केली. रिझवानने ५५ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ७८ धावांची खेळी करत पाकिस्तानला विश्वचषकात भारताविरुद्ध पहिला विजय मिळवून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!