मुंबई, दि.06 : राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती/ भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जातीच्या यादीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार शासनाने काही नवीन जातींचा अंतर्भाव करून तसेच वगळून अद्ययावत यादी तयार केली आहे.
नव्या बदलानुसार यापुढे ” ठेलारी” ही जात ‘भटक्या जमाती (ब)’ यादीतील अ.क्र. २७ येथून वगळून ‘भटक्या जमाती (क)’ यादीतील अ.क्र.२९ मध्ये धनगर जातीची तत्सम जात म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर केवट-तागवाले या जातीचा भटक्या जमाती (ब) मध्ये समावेश करण्यात आला आहे. आयोगाच्या शिफारशीनुसार इतर मागासवर्ग यादीतील अ. क्र. १८२ मधील माळी, बागवान, राईन (बागवान) समोर कुंजडा या जातीचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतचा शासनादेश आज निर्गमित करण्यात आला आहे. हा शासनादेश www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दरम्यान ठेलारी जातीचा धनगर जातीमध्ये समावेश करण्यात आल्याने धनगर समाज संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची मंत्रालयात भेट घेऊन आभार व्यक्त केले. यावेळी माजी खासदार डॉ. विकास महात्मे, अनंत बनसोडे, विठ्ठल मारनर, वामनराव मारनपावबा गोयेकर, देवा गोयेकर, बापू कोलपे आदी उपस्थित