ठाणे :  बायकोने चारित्र्यावर संशय घेतल्याने नव-याने संतापून तिची गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना ठाणे जिल्हयातील टिटवाळा शहरात घडली आहे.  टिटवाळा पोलिसांनी पती महेश मोपे याला अटक केली असून या प्रकरणाचा टिटवाळा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  महेश आणि माही मोपे  हे दांम्पत्य  टिटवाळा परिसरात राहत होते. महेश पडघा येथील डी मार्टच्या गोदामात काम करायचा. महेश आणि माही यांच्यात प्रेमसंबंध होते, त्यामुळे दोघांनी ३ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. महेश मोपोचे दुसऱ्या महिलेसोबतचे अनैतिक संबंध असल्याची माहिती  पत्नी माहीला मिळाली होती त्यामुळे या विषयी माहीन महेशला विचारणा केली. यावरून दोघांमध्ये नेहमी वादावादी भांडणे होत असतं.  

आज सकाळी सुध्दा दोघांमध्ये या विषयावरून भांडण झाले. भांडण इतके टोकाला गेले की. महेशने पत्नी माहीची गळा आवळून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करून पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. मृत माहीच्या सासरच्या मंडळींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. चौकशीत पती महेश याने गुन्ह्याची कबुली दिली. दोघांनीही प्रेमसंबधातून केलेले लग्न दोघांच्या कुटूंबियांना मान्य नव्हते. याप्रकरणाचा  पुढील तपास टिटवाळा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!