इंदोर : अहिल्यादेवीची नगरी असलेल्या इंदोर शहरात होळकरांच्या काळात होळी पेटवण्याची परंपरा २९५ वर्षांपासून सुरू आहे. होळीच्या निमित्ताने शहरातील रहिवासी पिढ्यानपिढ्या ही परंपरा पाळत आले आहेत.आजही परंपरेप्रमाणे राजवाड्यात ही होळी प्रथम पेटवली जाते. यामध्ये सर्व नागरिक सहभागी होतात. त्यानंतर परिसरात होलिका दहन केले जाते.
अशी सजवायचे होळी ..
होळकर आश्रित भालेकरी समाजातील काही लोक लाकूड, तूर बर्च, शेण आणि गवत यांनी होलिका सजवायचे. काठ्या, पाच रंगाच्या दोऱ्या आणि पांढऱ्या धाग्याने लाकडांना बांधले जायचे. साडी नेसवून आणि शेणापासून बनवलेल्या लहानशा माळ घातली जात. त्यानंतर मिरवणुकीच्या स्वरूपात पवित्र अग्नी आणून होलिका दहन केली जात.
वर्षानुवर्षे आग आणण्याची परंपरा
सध्याही शहरातील काही लोक ही परंपरा पाळत आहेत. राजवाडा येथे होलिका दहन केल्यानंतर ते तेथून अग्नी आणतात.त्याच अग्नीने त्यांच्या जागी बनवलेल्या होलिकाचे दहन करतात.