डोंबिवली : कल्याण आणि डोंबिवली स्टेशन परिसरात रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्याविरोधात महापालिकेने धडक कारवाई सुरू केल्याच्या विरोधात शेकडो फेरीवाल्यांनी देखील आक्रमक भूमिका घेऊन आधी पुनर्वसन करा त्यानंतर कारवाई अशी मागणी महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाच्या नेतृत्वाखाली शेकडो फेरीवाल्यांनी केडीएमसी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. हे आंदोलनात फेरीवाल्याने महापालिका प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

राष्ट्रीय फेरीवाला कायद्याचे परिणामकारक अंमलबजावणी करावी, महापालिकेने स्वतंत्र फेरीवाला विभाग सुरू करावा, फेरीवाल्यांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षण करून त्या फेरीवाल्यांना परवाना द्यावा, राष्ट्रीय शहर फेरीवाला समिती एकत्रित करून प्रत्येक व्यवसायधारकांना विमा, पेन्शन, मुलांना शालेय शिक्षणात सूट सारख्या सुविधा द्याव्यात. कल्याण शहरातील फेरीवाला व पथव्यवसायिक धारकांना जरीमरी नाल्यावर स्लॅब बांधून जागा द्यावी त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, फेरीवाल्यांवर कारवाईच्या नावाने मालमत्तेचे नुकसान करणे थांबवा अशा मागण्या करण्यात आल्याचे सांगितले.तसेच या सर्व मागण्या लवकर मान्य झाल्या नाही तर मंत्रालयाचे दार ठोठावणार असल्याचा इशारा यावेळी महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!