डोंबिवली – दिवाळी सणानिमित्त सोलापूर येथील भाऊराया हॅण्डलूम यांचे हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री केंद्राचे उदघाटन ज्येष्ठ पत्रकार मीना गोडखिंडी व सर्वेश हॉल संचालिका समाज सेविका लीना गधरे यांच्या हस्ते उद्धाटन पार पडले आले. डोंबिवली येथे नुकतेच करण्यात आले आहे. डोंबिवली शहरातील सर्वेश मंगल कार्यालय टिळक नगर डोंबिवली (पूर्व) येथे हे प्रदर्शन विक्री केंद्र भरविण्यात आले असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. हातमाग विणकाम करून तयार केलेले कापड अत्यंत चांगला दर्ज्याचा असते त्यामुळे हातमाग कापड प्रदर्शनाचा डोंबिवलीकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन हातमाग कापड प्रदर्शनाचे प्रमुख पांडुरंग पोतन यांनी केले.
पांडूरंग पोतन पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृतीच्या प्रसारासाठी व हातमागाच्या विणकाम करून वापरण्यायोग्य कापड तयार केले जाते या कापडाच्या वापरामुळे कोणत्याही प्रकारचा त्वचा रोग होत नाही. मात्र हे कापड तयार करण्यासाठी मनुष्यबळ अधिक लागत असल्याने सद्या विक्री दरापेक्षा उत्पादन खर्च जास्त असल्याने हातमाग कापडाची निर्मिती कमी प्रमाणे होत आहे त्यामुळे या व्यवसायामध्ये आमची ही नवी पिढी समोर येत नसल्याची खंत व्यक्त केली या प्रसंगी गोवर्धन कोडम , बाळू कोडम, पुरुषोत्तम पोतन , दीपक गुंडू, श्रीकांत श्रीराम, लक्ष्मण उडता, यानी उपस्थित होते.
सुती व खादी कापडाच्या विक्रीवर २०% टक्के सुट
या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या हातमाग व यंत्रमागवर उत्पादित वस्त्रे जसे कॉटन साडी , इरकल साडी , मधुराई साडी , खादी साडी , धारवाड साडी , मधूराई सिल्क साडी , सेमी पैठणी, खादी सिल्क साडी , प्रिंटेड ड्रेस, वर्क ड्रेस मटेरियल , पटोला ड्रेस , कॉटन परकर , टॉप पिस , सोलापूर चादर , बेडशीट , नॅपकिन , सतरंजी , पंचा , टॉवेल , वुलनचादर , दिवाणसेट , प्रिंटेड बेडशीट , पिलो कव्हर , लुंगी , व शर्ट , कुर्ता , बंडी , गाहून , विविध प्रकारच्या विक्री साठी टेवण्यात आले आहे. सुती व खादी कापडाच्या विक्रीवर २०% टक्के सुट ठेवण्यात आले असून , डोंबिवलीकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा.
सर्वेश मंगल कार्यालय टिळक नगर डोंबिवली (पूर्व). हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे असेही पेातन यांनी सांगितले.