महिलांनो सन्मानाने जगायला शिका – गिता सिंह
संस्थेच्या वर्धापनदिनी गिता सिंहचे महिलांना आवाहन
घाटकोपर ( निलेश मोरे ) देशाच्या प्रगती मध्ये महिलांचं अनन्य साधारण महत्व आहे . स्वातंत्र्यापूर्वी चूल आणि मूल या सिमेपुरतीच मर्यादित असलेली स्त्री आज स्वातंत्र्यानंतर विविध क्षेत्रात आपला मानाचा तुरा रोवत आहेत . देशाच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी , पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील , पहिल्या मुख्यमंत्री सुचेता कृपलानी , महिला आयएस अधिकारी किरण बेदी , गानकोकिळा लतादीदी मंगेशकर या महिलांनी स्वकर्तृत्वावर आपलं नाव उंचावत ठेवलं आहे . सन्मानानं कस जगावं या महिलांकडून शिकावं . महिलांनी शिकलं पाहिजे , शिकून संघटीत झालं पाहिजे . मुलगी शिकली प्रगती झाली पण मुलगी नुसती शिकून प्रगती होणार नाही तर दोन हात एक करून संघटीत होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रगती होईल त्यासाठी महिलांनो एकत्रित येऊ , संघटीत होऊ आणि सन्मानाने जगू असं आवाहन अखिल महिला सशक्तीकरण मंचच्या सल्लागार गिता सिंह यांनी पवई येथील मिनी पंजाब हॉल येथे संस्थेच्या वर्धापन दिन कार्यक्रम सोहळ्यात उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना केले . देशपातळीवर महिलांसाठी कार्य करणाऱ्या अखिल महिला सशक्तीकरण मंच या संस्थेचा पहिला वर्धापन दिन पवई येथील मिनी पंजाब या हॉल मध्ये साजरा करण्यात आला . यावेळी 250 ते 300 महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या . कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा ठाकूर , मुंबई अध्यक्षा नीलम ठाकूर , आबा सिंग , सीमा सिंह , अनिता चव्हाण आदी प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित होत्या . या वर्धापन दिनी महिलांना मार्गदर्शन करतांना संस्थेच्या सल्लागार गिता सिंह म्हणाल्या कि आज संस्थेच्या कार्याला एक वर्ष पूर्ण होतोय अखिल महिला सशक्तीकरणं हे महिलांसाठी एक हक्काचं व्यासपीठ आहे . या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही तुमच मत मांडू शकता आणि अन्याया विरोधात आवाज उचलू शकता असं संस्थेच्या सल्लागार गिता सिंह यांनी मार्गदर्शन करताना महिलांना प्रतिपादन केले . अखिल महिला सशक्तीकरण मंच हि संस्था तळागाळातील गरीब महिलांसाठी कार्य करते , महिलांना स्वावलंबी व सबळ करण्यासाठी अशा गरीब महिलांना संस्थेच्या माध्यमातुन प्रशिक्षण दिले जाते . स्त्रीचा सन्मान हाच आमच्या संस्थेचा उद्देश असल्याचं अध्यक्षा प्रतिभा ठाकूर या प्रतिक्रिया देताना म्हणाल्या . संस्थेच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला यावेळी महिलांसाठी वेगवेगळे मनोरंजन खेळ खेळण्यात आले .यावेळी संस्थेकडून उपस्थित महिलांना भेट देखील देण्यात आले .