मंत्रालय  की आत्महत्यालय ?  बळीराजाचा पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई : मंत्रालयात पुन्हा एकदा बळीराजाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडलाय. नाशिक येथील ५६ वर्षीय गुलाब मारुती शिंगारे या शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.  मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा प्रकार घडला. सुदैवाने वेळीच मंत्रालयाचे सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे दुर्घटना टळली.
मंत्रालयात आत्महत्या आणि आत्महत्यांचे प्रयत्न वारंवार घडत असल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मंत्रालय की आत्महत्यालय अशी टीका केली होती. पुन्हा एकदा घडलेल्या या प्रकारामुळे  ‘मंत्रालय की आत्महत्यालय ?’ असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.
पोलिस पाटील आणि जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या घरावर कब्जा केल्याचा आरोप शिंगारे यांनी केलाय. न्याय मिळावा यासाठी आज ते मंत्रालयात आले होते.  मात्र अधिकाऱ्यांकडून व्यवस्थित  वागणूक न मिळाल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.  शिंगारे यांना मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यापूर्वी  ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी  22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं. त्यानंतर मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन  उडी घेतल्याने  हर्षल रावते  या  तरुणाचा मृत्यू झाला होता. मंत्रालयात  सातत्याने होत  असलेल्या  आत्महत्या आणि आत्महत्येचा   प्रयत्न रोखण्यासाठी  खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयाच्या लॉबीमध्ये नायलॉन जाळ्या बसवण्यात आले होत्या. त्यावेळी जाळ्या बसवण्याच्या प्रकारावर विरोधकांनी मंत्रालय की सर्कसचा फड अशी टीका सरकारवर केली होती. आजच्या प्रकारामुळे पुन्हा एकदा सरकार विरोधकांच्या कोंडीत सापडण्याची सापडलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!