पनवेल, : पेण गौरी गणपती सणानिमित्त सोलापुर येथील भाऊराया हॅन्डलूमचे हातमाग व यंत्रमाग कपड्याचे भव्य प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन पेण येथे नुकतेच करण्यात आले. शहरातील महात्मा गांधी वाचनालय पेण व काँग्रेस भवन अलिबाग अर्बन बँक शेजारी कर्वे रोड अलिबाग हे प्रदर्शन सुरू आहे प्रदर्शनाचे उद्घाटन महात्मा गांधी वाचनालय चे अध्यक्ष अरविंद वनगे, ग्रंथपाल वैजयंती लकारे , कार्याध्यक्ष आप्पा सत्व यांच्या हस्ते दीपप्रज्वल करून उदघाटन करण्यात आले.
दिनांक 21/ 8 /2022 ते 7/ 9 / 2022 पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे खात्रीशिर असलेले या कॉटन हातमाग कापडाच्या अलिबाग व पेण करण्याचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संयोजक पांडुरंग पोतन यांनी दिली. गौरी गणपती सणानिमित्त विक्रीवर 20 टक्के सूट ठेवण्यात आली आहे त्यांनी यावेळी सांगितले या प्रदर्शनात हातमाग व यंत्रमागा पासून बनवण्यात आलेल्या विविध प्रकारच्या कॉटन साडी, खादी साडी, मधूराई कॉटन साडी, मधुराई सिल्क साडी, लिनन कॉटन साडी, कांजीवरम साडी, सेमी पैठणी साडी, पटोला ड्रेस मटेरियल, पुणेरी ड्रेस मटेरियल, सोलापूरचे प्रसिद्ध चादर, उलन चादर, डबल बेडशीट सतरंजी टॉवेल, पंचा, लुंगी, खादी शर्ट, कॉटन बंडी, कुर्ता, पाजमा गाऊन ,वॉलपिस असे विविध प्रकारचे विक्री साठी उपलब्ध आहेत नामांकित हातमाग उत्पादनाचा समावेश असल्याचे योगेश्वर पोतन यांनी सांगितले आहे.