डोंबिवली : मनसे पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. हा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी एमआयडीसीच्या निवासी विभागातील खा डॉ. शिंदे यांच्या निवासस्थानात पार पडला. मनसेच्या रस्ते अस्थापना विभागाचे डोंबिवली शहराध्यक्ष ओम लोके यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सेनेत प्रवेश केला. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, भाऊसाहेब चौधरी, महेश पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पक्षांतर्गत वाढलेल्या कुरघोड्यांमुळे आपण पक्ष सदस्याचा राजीनामा येत असल्याचे लोके यांनी सांगितले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे शिवसेनेत जाहीर स्वागत करत त्यांना राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व कार्यकर्त्यांना जनहितासाठी काम करण्याची संधी मिळेल, असेही यावेळी आश्वस्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!