डोंबिवलीतील नवकलाकारांना मिळाले माईम अॅक्टींगचे धडे

डोंबिवली : डोंबिवलीतील नवकलाकारांना अॅक्टींगचे मार्गदर्शन मिळावे या हेतूने रोटरॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली सनसिटी यांच्यावतीने रविवारी मोफत माईम अॅक्टींग शिबीर  घेण्यात आला.  माईम कसे करावे त्याचा सराव कशा पध्दतीने केला पाहिजे याचे धडे दिले. यावेळी २१ तरूणांना सहभाग घेतला होता.  सांस्कृतीक नगरी म्हणूनच डोंबिवली ओळखली जाते. शहरात विविध क्षेत्रातील दिग्गज कलाकार मंडळी राहतात. कलेच्या क्षेत्रात पर्दापण करणा-या नवकलाकारांना अॅक्टींगचे मार्गदर्शन मिळाले पाहिजे या उद्देशानेच डोंबिवली पूर्वेतील स. वा. जोशी शाळेशेजारील जे. के. प्री. स्कूल येथे हे शिबीर पार पडले. यावेळी रोटरॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली सनसिटीचे अध्यक्ष विवेक खेडेकर जी माईम स्टुडीओचे अजीतसर यांनी मागर्दशन केले.

One thought on “डोंबिवलीतील नवकलाकारांना मिळाले माईम अॅक्टींगचे धडे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *