बलात्काराच्या घटनांविरोधात काँग्रेसचा कँडल मार्च : राहुल-प्रियांका मध्यरात्री रस्त्यावर

नवी दिल्ली : उन्नाव, कठुआ बलात्कार प्रकरणांविरोधात काँग्रेसने मध्यरात्री कॅडल मार्च काढून या घटनांचा निषेध नोंदवला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि  बहीण प्रियांका गांधी यांनी मध्यरात्री दिल्लीतील इंडिया गेटसमोर निदर्शनं केली. यावेळी हजारोंच्या संख्येत नागरिकही राहुल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रस्त्यावर उतरले होते.

नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयापासून 12 वाजता सुरु झालेल्या या मोर्चाचे मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास समारोप झाला.   ‘बेटी पढाओ बेटी बचाओ’चा नारा देत  सरकारने महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराविरोधात कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. कँडल मार्च काढून बलात्काराच्या घटनांचा निषेध नोंदवला आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.  राहुल गांधींसोबत प्रियांका गांधी, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल यांच्यासह हजारोंच्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते या मेणबत्ती मोर्चात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!