ठाणे : शहापूर नगरपंचायत मधील वार्ड क्रमांक दोन येथील भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक विनोद भारत कदम घरोघरी जाऊन वार्ड क्रमांक दोन मधील महिला भगिनींना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या व भाऊबीज भेट देत आपले ऋणानुबंध जपले आहेत. यावेळी नगरसेवक विनोद कदम यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शक अवधूत दादा बुरसे व शहापूर शहर उपाध्यक्ष नवल चव्हाण,हर्षल ननवरे, स्वप्निल दुमाडा,वसंत जाबर,चेतन बांगरे, भारत चाकर ,संतोष देशमुख, निलेश ओळंबा ,टक्या पाठारे ,सुरज गौरव शेलार, सुरज बोये, शेखर जाबर संजय शेलार, पियुष चव्हाण,आदी विनोद कदम समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते.या सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते दिवाळी निमित्ताने भेट वस्तू व मिठाईचे वाटप करण्यात आले. नगरसेवक विनोद कदम यांनी या उपक्रमातून आपली सामाजिक बांधिलकी जपल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!