कल्याण : सध्या संपूर्ण जगात टोकियो ऑलम्पिकची जगभरात जोरदार चर्चा आहे. अशातच नीरज चोप्राने ॲथलेटिक्स स्पर्धेतील भालाफेक या खेळामध्ये सुवर्णपदक पटकावल्याने देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यामुळे नीरज चोप्रावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यातच आर्टिस्ट यश महाजन यांनीही नीरज चे चित्र रेखाटून त्याला अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यश महाजन यांना १५ वर्षाच्या चित्रकलेचा अनुभव असून सध्या शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आजपर्यंत त्यांनी अनेक महापुरुषापासून कलाकारांपर्यत चित्र रेखाटली आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, अमिताभ बच्चन, बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी अश्या अनेक समाज सुधारक , नेत्यांची चित्र, रांगोळीच्या माध्यमातून साकारली आहेत तसेच स्वच्छता अभियान, कोरोना विषयावरील जनजागृती आदी जवलंत विषयावरही चित्राच्या माध्यमातून समाज प्रबोधन करीत आहेत.