ठाणे, अविनाश उबाळे : शहापूर तालुक्यात माझ्या कार्यकाळात रस्ते,वीज, पर्यटनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात आली आहेत ,व काही कामे मंजूर असून अजूनही ती कामे पूर्ण झाली नाहीत अशी खंत बरोरा यांनी व्यक्त केली. विशेषतःशहापूर बसपोर्टचे व प्रशासकीय इमारतसाठी मी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे ही कामे आता लवकरच मार्गी लागतील अशी ग्वाही देत शहापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असल्याचे बरोरा यांनी सांगितले.
शहापूर तालुक्यातील पेंढरघोळ येथे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या वतीने बुधवारी शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पत्रकारांशी बरोरा यांनी संवाद साधला तालुक्यातील विविध समस्या माध्यमांद्वारे नेहमीच मांडल्या जातात त्या सोडविण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे असे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी सांगितले. तालुक्यातील विविध समस्यांवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर माजी आमदार बरोरा यांनी अगदी दिलखुलासपणे व मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नेते खंडुकाका बरोरा,महिला,पुंडलीकजी शिर्के, अविनाश थोरात,नंदकुमार मोगरे,संजय निमसे,विनायक पवार,विठ्ठल सांडे,शांताराम सासे,मा.तालुकाध्यक्ष मनोजजी विशे,रविशेठ पाटील,तुकाराम बर्डे,भरतजी उबाळे, निलेशजी पाटोळे,बबन सातपुते,अनिल गगे,मुकुंद उबाळे,वसंत दवणे,बाळा सासे,नामदेव सोनारे,अनंता सोनारे,लक्ष्मण सोनारे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पदाधिकारी व पत्रकार मित्रांचे स्वागत ठाणे जिल्हा परिषदेचे माजी.समाजकल्याण सभापती निखिल बरोरा व माजी सरपंच भास्कर बरोरा यांनी केले.