सेल्फी काढण्यासाठी झुंबड
डोंबिवली : आपण माणसांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करतो, पण डोंबिवलीत एका बैलाचा वाढदिवस मोठया धुमधडाक्यात साजरा करण्यात आला आहे. डोंबिवलीतील मोठागावातील किरण म्हात्रे यांनी आपल्या बैलाचा म्हणजेच शहेनशहाचा वाढदिवस केक कापून मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला.
इतकेच नाही तर शहेनशहाच्या वाढदिवसानिमित्त म्हात्रे यांनी ऑर्केस्ट्रा सह जंगी पार्टीचे आयोजन केले होते. बर्थडे निमित्त शहेनशाह ला देखील सजवण्यात आलं होतं. शेकडो ग्रामस्थ आपल्या लाडक्या शहेनशहाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आले होते ..

म्हात्रे कुटुंबीयांनी शहेनशहाला केक भरवूनन आनंद साजरा केला..शहेनशहा सोबत सेलिब्रिटी प्रमाणे सेल्फी घेताना आलेल्या पाहुण्यांची एकच गर्दी उसळली. शहेनशाच्या वाढदिवसाच्या जल्लोषाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.