मुंबई महापालिका शाळेतील पटसंख्येत कमालीची घसरण

 ४ वर्षात ९० हजार विद्यार्थी घटले 

प्रजाचा अहवालात प्रसिध्द

मुंबई : मुंबई महापालिका शाळांमधील शिक्षणाच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकणारा एक अहवाल मंगळवारी प्रजा फाऊंडेशनने जाहिर केला. गेल्या चार वर्षात मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्याथ्याँच्या पटसंख्येत कमालीचे घसरण झाली असून, तब्बल ९० हजार २०२ विद्याथ्याँची हजेरी पटरावरून गळती झाल्याची धक्कादायक बाब प्रजा फाऊंडेशनने प्रसिध्द केलेल्या अहवालातून समोर आलीय. गेल्या अनेक वर्षापासून पालिका शाळेतील विद्याथ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी होत असल्याची माहिती प्रजाकडून जाहीर केली जातेय.

२०१६- १७ मध्ये  पालिकेच्या शाळेत एकूण  ३ लाख ४३ हजार ६२१ विद्यार्थी संख्या आहे. पालिका शाळेत २०१२- १३ मध्ये ही विद्यार्थी संख्या ४ लाख ३४ हजार ५२३ हेाती. त्यामुळे विद्याथ्यांच्या गळतीचे प्रमाण खूप मोठ असल्याचे दिसून येतय. सेमी इंग्लिश शाळेत गळतीचे प्रमाण ८ टक्के आहे. प्रजाने माहितीच्या अधिकारात ही माहिती उघड केलीय. प्रजा फाउंडेशनच्यावतीने हंसा रिसर्चतर्फे २० हजार ३१७ कुटुंबांच्या वार्षिक घरगुती सर्वेक्षणही करण्यात आले. पालिका शाळेत मिळणा- या वाईट सोयी सुविधांमुळे ४८ टक्के लोकांनी असमाधानता व्यक्त केली तर पालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा खालावलेला असल्याचे ४८ टक्के लोकांना वाटताये. पालिका शाळेत शिक्षण घेतल्यास अभ्यासात सुधारणा होणार नाही. तसेच भविष्यात रोजगाराच्या संधी मिळणार नाहीत असे ४१ टक्के लोकांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत प्रजा फाउंडेशनचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त नीताई मेहता, प्रजा फाउंडेशनचे प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के,  हंसा रिर्सचच्या वरिष्ठ उपाध्यक्ष अंजन घोष आदी उपस्थित होते.

शिष्यवृत्तीचा टक्का घसरला
पालिकेला २०१६- १७ दरम्यान प्रती विद्यार्थी रु. ४४ हजार ३९४ चा खर्च आला. २०१७- १८ दरम्यान प्रती विद्यार्थी ५२ हजार १४२ अशी तरतूद करण्यात आलीय. पालिकेच्या बजेटमध्ये प्रत्येक वर्षी वाढ झालीय. २००८- ०९ साली शाळांसाठी ९११ कोटी बजेट होता २०१७- १८ या वर्षासाठी २४५४ कोटीपर्यंत वाढलाय. एका विद्याथ्र्यामागे ५२ हजार १४२ रूपये इतकी तरतूद आहे. मात्र पालिका शाळांतील विद्यार्थी स्थिती खालावलेलीच दिसून येतेय असे प्रजाकडून स्पष्ट करण्यात आलय. एसएससी निकाल मार्च २०१७ मध्ये पालिका शाळाचा ६८.९१ तर खासगी शाळेचा निकाल९१. ८१ टक्के होता. शिष्यवृत्ती परिक्षेतही पालिका शाळेचा टक्का कमी असल्याचे स्पष्ट झालय. पालिका शाळेतील एकूण शिष्यवृत्तीला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी निव्वळ १.६ टक्के मुलांना शिष्यवृत्ती मिळाली तर खासगी शाळेतील ११.८ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळविण्यात यशस्वी झालेत.

नगरसेवक उदासीन
पालिकेच्या सभागृहात शिक्षणावर आधारीत १८३ प्रश्न विचारण्यात आले. केवळ आठ नगरसेवकांनी ४ पेक्षा अधिक प्रश्न विचारले. तर १६७ नगरसेवकांनी शिक्षणावर आाधरीत एकही प्रश्न विचारलेला नाही. विद्याथ्यांच्या गळती विषयी केवळ ३ प्रश्न विचारण्यात आले त्यापेक्षा शाळांच्या नावावरून १० प्रश्न विचारण्यात आल्याचेही अहवालात म्हटलय. त्यामुळे शिक्षणाबाबत नगरसेवकांनी उदासीन भूमिकाही दिसून येत असल्याचे प्रजाचे म्हणणे आहे. आमदारांनी ९५९ प्रश्न उपस्थित केले. आमदार अमिन पटेल यांनी सर्वाधिक १८४ प्रश्न विचारले. यंदाच्या वर्षात् २९ हजार १८६ विद्याथ्यांच्या गळती विषयी पाच प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
———————

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!