मुंबई (अजय निक्ते) : गेले काही दिवस धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक दिनाच्या कार्यक्रमाची खूप चर्चा समाज माध्यमात मोठया प्रमाणावर झाली. या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड स्टार्स आपल्या मुलांना चिअर अप करण्यासाठी सहभागी झाले होते. यावेळी बच्चन कुटुंबाची लाडकी नात , अभिषेक आणि ऐश्वर्या यांची कन्या, आराध्या बच्चन हिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांची मने जिंकली. समाज माध्यमातून आराध्याच्या अभिनयाचे सर्वजण कौतुक करत आहेत. अशा परिस्थितीत आराध्याचे आजोबा अमिताभ बच्चन यांनाही आराध्याचे काम पाहून खूप आनंद झाला आहे.
अलीकडेच, बिग बींनी त्यांच्या नवीन ब्लॉगमध्ये आराध्याच्या स्तुती केली आहे. सध्या मी आराध्याच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात व्यस्त आहे. हा प्रत्येकासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. आराध्या स्टेजवर अगदी नैसर्गिक होती. लहान मूल आता लहान राहिले नाही, अशा शब्दात आजोबांनी आपल्या नातीचे कौतुक केले आहे.