जिम्नॅस्टिक्स नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये डोंबिवलीतील भोईर जिमखान्याचे सुयश

डोंबिवली  :  वडाळा येथील मुंबई बॉम्बे फिजिक कल्चर असोसिएशन येथे पार पडलेल्या २८ व्या उप कनिष्ट कलात्मक जिम्नॅस्टिक्स नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये डोंबिवलीतील भोईर जिमखान्यातील माणेश गाढवे याचा प्रथम क्रमांक आणि सानिका अत्तरडे हिने दुसरा क्रमांक दृतीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत देशातील २० राज्यातील २०० सखेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत डोंबिवलीतील भोईर जिमखान्यातील माणेश गाढवे हा महाराष्ट्र चा कर्णधार असून सानिका अत्तरडे, आर्य परब , हिमांसू म्हात्रे, अथर्व टेमकर व शुभम सोनकुसरे यांचा सहभाग होता. या स्पर्धेत भोईर जिमखान्यातील खेळाडूंनी ९ सुवर्ण, २ रौप्य व ३ कांस्य पदक पटकावले . माणेश गाढवे याने संघ सुवर्णपदक, अष्टपैलू सुवर्ण, पोम्मेल हॉर्स सुवर्ण, फ्लोअर -कांस्य पदक व वळटिंग-कांस्य पदक, सानिका अत्तरडे याने संघ सुवर्णपदक ,बीमसुवर्ण, फ्लोअर रौप्य,अष्टपैलू रौप्य, आर्य परब याने संघ सुवर्णपदक ,हिमांशू म्हात्रे याने संघ सुवर्णपदक, समांतर बार कांस्य, अथर्व टेमकर याने संघ सुवर्णपदक ,शुभम सोनकुसरे याने संघ सुवर्णपदक पटकावले. या खेळाडूंचे भोईर जिमखान्याचे संस्थापक मुकुंद भोईर, मार्गदर्शक पवन भोईर, प्रशिक्षक रविंद्र शिर्के यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!