भिवंडीत मटका- जुगार तेजीत, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल !
भिवंडी – यंत्रमागाच शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात सध्या मटका, जुगाराचे अड्डे तेजीत सुरू आहेत याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मटका, जुगारामुळे इथला कामगारवर्ग आणि हुक्का पार्लरमुळे तरुणपिढी बरबाद होत आहेत. त्यामुळं मटका, जुगार आणि हुक्का अड्डयावर कारवाई करून कायमची बंदी करावी अशी मागणी भिवंडीकरांमध्ये जोर धरू लागलीय.
भिवंडीत कामगारवर्ग मोठ्या प्रमाणात राहत आहे. यंत्रमाग कामगार तब्बल 12 ते 14 तास काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. मात्र मेेेहनतीचे पैसे जुगारावर उधळत आहे त्यामुळे महिला वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाडीपार , मेट्रो हॉटेल , खडक रोड तसेच शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबला कम्पाउंड येथे युसूफ आणि अन्नू नामक व्यक्तीचा मोठा जुगार -मटका अड्डा आहे. भिवंडीतील या मटका-जुगाराच्या अड्ड्याची खुद्द ठाणे पोलीस आयुक्तांनी दखल घेऊन दीड वर्षांपूर्वी बंद केला होता. आता हा पुन्हा तेजीत सुरू झालाय. भिवंडीत जुगार, मटका कशा पद्धतीने सुरू आहे याचे व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळं ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे. तसेच शहरातील कणेरी , दांडेकर जवळ ,खोका कम्पाउंड ,फुलेनगर, असबीबी रोड, खाडीपार, एकविरा ढाबा आदी अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने हुक्का पार्लर सुरू आहे. शाळकरी व कॉलेजचे विद्यार्थी येत असतात. त्यामुळे मटका ,जुगार आणि हुक्का पार्लर बंद करावे या मागणीसाठी भिवंडीवासीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
**