मुंबई: बदलापूरच्या घटनेत राजकारण दिसत असेल तर तुम्ही स्वतः विकृत आहात अशा शब्दात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शनिवारचा बंद हा राजकीय नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातल्या परिस्थितीबद्दल सगळे राजकीय पक्ष चिंतेत आहेत. आधी बहीण सुरक्षित करा, मग लाडकी बहीण योजना आणा. शक्ती विधेयक आम्ही आणणार होतो. शक्ती विधेयक आम्ही आणले म्हणूनच सरकार पडलं का? विकृती दूर करण्यासाठी 23 तारखेला शहरातील ग्रामीण भागातील सगळ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र बंद करावा . बदलापूरला जायचं आहे. मी बदलापूरला जाईल पण सध्या त्या पालकांना त्रास मला द्यायचा नाही…मी जाईन… मी काही स्थानिकांना बोलवलं आहे… काही आमचे पदाधिकारी यांना सुद्धा बोलवलं आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, घटनाबाह्य मुख्यमंत्री तुम्ही थोडे दिन के मेहमान हो… मुख्यमंत्री म्हणत असतील दोन महिन्यात फाशी दिली एका आरोपीला तर त्याची SIT नेमा आणि कोणाला फाशी दिली ते सांगा… क्षमता नसलेला हा मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्र्यांनी बदलापूर ला जायचं होतं तर हे रत्नगिरीमध्ये होते जाऊन बसले त्यात गुलाबी जॅकेट सुद्धा होतं. ही शाळा भाजपच्या लोकांची होती खरं खोटं माहिती नाही. वामन म्हात्रेवर गुन्हा दाखल झाला नसता. सुषमा अंधारेंनी आंदोलन केलं म्हणून गुन्हा दाखल झालं असेही ठाकरे म्हणाले.
****