ठाणे अविनाश उबाळे : शहापूर या आदिवासी बहुल भागातील नागरिकांपर्यंत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या (आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड) लाभार्थीचे ई-वॉर्ड नोंदणीचे काम अत्यंत संथगतीने होत असल्याचे दिसून येत आहे.
आशा स्वयंसेविका,गटप्रवर्तक व केंद्र चालक आरोग्य सेवक, आरोग्य मदतनीस,या कर्मचाऱ्यांकडून आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड) लाभार्थींच्या नोंदणीचे काम हे ग्रामीण भागात अगदी कासव गतीने सुरू असल्याचे दिसून येत असल्याने योग्य वेळी जनजागृती व व प्रत्येक कुटुंबाची नोंदणी न झाल्यास या योजनेपासून अनेक नागरिकांना वंचित राहावे लागले अशी परिस्थिती आहे.
सदर योजनेचे काम गावपातळीवर शीघ्रगतीने राबविण्यात याव्यात अशा सूचना शहापूरचे गटविकास अधिकारी भाऊसाहेब रेंगडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भाग्यश्री सोनपिंपळे यांनी तालुक्यातील प्राथमिक केंद्रातील आरोग्य अधिकारी,ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकाऱ्यांना देखील दिल्या आहेत.
केंद्र सरकार पुरस्कृत असलेली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविण्यात येत असून या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डचे वितरण करण्यासाठी गावपातळीवर गती वाढवून लवकरात लवकर सदर कार्डचे वितरण करुन ई – केवायसी करणे गरजेचे आहे.यासाठी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्ड नोंदणीचे काम आशा स्वयंसेविका व केंद्र चालक यांनी सहकार्याने करावयाचे आहे.
परंतु सर्व वैद्यकिय अधिकारी व सेवक यांनी आपल्या स्तरावरून आशा स्वयंसेविका,गटप्रवर्तक व केंद्र चालक यांना सुचना देऊन ३१ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दरम्यान य योजनेच्या माध्यमातून कुटूंबांना प्रतिवर्ष ५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळणार आहे.परंतु आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनमानी व भोंगळ कारभारामुळे आयुष्यमान हेल्थ कार्डापासून अनेक जण वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आयुष्मान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचा ५ लाख रुपयांचा विमा उतरवला जाणार आहे.आपल्या जवळच्या ग्रामपंचायतीचे सेतु केंद्र किंवा ग्राहक सेवा केंद्र येथे जावुन नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढून शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा – डॉ.भाग्यश्री सोंनपिंपळे,तालुका आरोग्य अधिकारी शहापूर.