अयोध्या, 27 डिसेंबर : अयोध्येत आगामी 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिरात मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यापूर्वी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता अयोध्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘अयोध्या धाम जंक्शन’ असे करण्यात आलेय.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच अयोध्या दौऱ्यावर असताना रेल्वे स्थानकाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी अयोध्या रेल्वे स्थानकाचे अयोध्या धाम नामकरण करण्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. अयोध्या जंक्शनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आणि अयोध्या दिल्ली वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर रोजी येत आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी अयोध्या जंक्शन रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या जंक्शनची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी अयोध्या जंक्शनचे नाव बदलून अयोद्या धाम करण्याची इच्छा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. यानंतर बुधवारी अयोध्या जंक्शनचे नाव बदलून अयोध्या धाम करण्यात आले. याला रेल्वे विभागाने दुजोरा दिला आहे.