रिक्षाची मोफत सेवा : बाबासाहेबांना अनोखी मानवंदना 
पनवेल : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती देश विदेशात मोठया उत्साहात साजरी होत असतानाच, त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाद्वारे बाबासाहेबाना मानवंदना दिली जाते. मात्र पनवेल मधील दोघा बंधूनी प्रवाश्यांसाठी स्वतःच्या रिक्षाची मोफत सेवा ठेवून बाबासाहेबाना अनोखी मानवंदना दिलीय.
पनवेल येथील रोडपाली गावातील राकेश गायकवाड आणि हरेश गायकवाड या बंधूनी बाबासाहेबांच्या जयंती निमित्त प्रवाशांसाठी एक दिवस मोफत रिक्षा सेवा ठेवली होती.  राकेश आणि हरेश यांच्या या मोफत सेवेचे पनवेल तालुक्यात सर्वांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *