डोंबिवली : आशा सेविकांना ऑनलाईन काम करण्याची सक्ती करण्यात आली आहे. या विरोधात कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीत काम करणाऱ्या आशा सेविकांनी आज महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. ठाणे, पालघर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन यांच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आशासेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 


अशा सेविकांना ऑनलाइन काम करण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र ऑनलाईन काम करण्यास आशा सेविकांनी नकार दिला आहे. आशा सेविकांना दर महिन्याला साडेपाच हजार रुपये मानधन दिले जाते. या साडेपाच हजार रुपयांमध्ये त्या घर खर्च भागविणार की स्मार्ट फोन घेणार ? असा प्रश्न त्यांनी केला. ऑनलाईनची सक्ती करण्यात येऊ नये. आशा सेविकांना किमान वेतन देण्यात यावे. कामाच्या वेळा आणि प्रकार ठरवून दिला पाहिजे. तसेच दिवाळी सण तोंडावर आहे. आशा सेविकांना किमान पाच हजार रुपयांचा बोनस द्यावा. सरकारी सुट्टीच्या दिवशी लाभार्थींच्या माहिती मागू नये. डेंग्यू, क्षयरोग आणि कुष्ठरोग कामाचे रोजचे दोनशे रुपये देण्यात यावे. गटप्रवर्तकांना सुपरवायझरचा दर्जा दिला जावा. सीएचओ नसलेल्या सर्व सेंटरमधील आशांना आरोग्य वर्धिनीचा निधी मेकिडल ऑफिसरच्या सहीने दिला जावा. या विविध मागण्या यावेळी मोर्चाच्या दरम्यान आशा सेविकांनी केल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!