कल्याण- देशातील ख्यातनाम नेत्रउपचाराची साखळी एएसजी रूग्णालयाची ७वी शाखा कल्याणमध्ये सुरू झाली असून, या शाखेचे उद्घाटन खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडले. डोळ्यासंदर्भातील अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून सुविधा देणार सुसज्ज हॉस्पिटल आहे. कल्याण शहरात अशा हॉस्पिटलची आवश्यकता होती. सर्व तज्ञ डॉक्टरांची टिम असल्याने रुग्णांना उत्तम उपचार याठिकाणी केले जातील. असे प्रतिपादन उदघाटन प्रसंगी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले.
कल्याण पश्चिमेतील रॉक माउंट रेसिडन्सी, खडकपाडा येथे हे रूग्णालय सुरू करण्यात आले असून, या रुग्णालयात मोतीबिंदू, तेसीक विट्रो रेटिना सर्जरी, आक्युलोप्लास्टी, ग्लुकोमा कोर्निया, तिरळेपणा, ऑप्थल्मोलॉजी नेत्ररोगाच्या श्रेणीवर अत्याधुनिक उपचार उपलब्ध होणार आहेत. या रुग्णालयात डोळ्यांशी निगडित सर्व जटील शास्त्रक्रिया, निदान आणि उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. सध्या सर्वच वयोगटातील लोकांचे स्क्रीनटाईमस अधिक असल्याने डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत. याकरिता सातत्याने शाळा, महाविद्यालय तसेच संस्था, संघटना याठिकाणी डोळ्यांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. वर्षातून प्रत्येकाने किमान २ वेळा तरी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
२००५ मध्ये डॉक्टर अरुण सिंघवी आणि डॉक्टर शिल्पी गांग या एम्स मधील दोन अनुभवी व्यक्तींनी एएसजी आय समूहाची महुर्तमेढ रोवली. त्यानंतर काही अनुभवी डॉक्टरांचा एएसजी समूहात समावेश झाल्यामुळे त्यांचा विस्तार होत गेला. प्रत्येकाला जगातील सर्वोत्तम सुविधा देण्याबाबत कोणताही भेदभाव न करता समान उपचार पद्धती उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने एएसजी समूहाची स्थापना करण्यात आली.
एएसजी समूहाचे रुग्णालय संपूर्ण भारतात कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एएसजी रुग्णालयांची शाखा पूर्व आफ्रिका खंडातील युगांडा मधील कपाला येथे कार्यरत असून दुसरी शाखा नेपाळ मधील काठमांडू येथे आहे. एएसजी आय समूहाला आजवर अचिव्हरर्स २००९, उत्कृष्ट सेवेसाठी वेलनेस २०१०, राजीव गांधी गोडमेडल २०१४ आदी पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे. एएसजी नेत्र रुग्णालयात चार अनुभवी आणि वरिष्ठ डॉक्टरांची टिम काम कार्यरत असणार आहे ज्यामध्ये डॉक्टर नितेश साळुंखे, डॉक्टर रोहित मेंडके, डॉक्टर मानस देशमुख आणि डॉक्टर हरीष पाठक यांचा समावेश आहे.