अपोलो रुग्णालय तर्फे मुंबई व नवी मुंबईतील १८ अवयव दात्यांचा गौरव
मुंबई : अवयव दान करून रुग्णाचे आयुष्य वाचवणारे दाते व नातेवाईक यांचा सत्कार करून, नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने मुंबईमध्ये ऑर्गन डोनर सपोर्ट ग्रुपची बैठक आयोजित केली होती. शहरात एक वर्ष पूर्ण केल्यानंतर, हॉस्पिटलने १६ लिव्हर ट्रान्सप्लांट (मृत डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट ६ व जिवंत डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट १०) आणि १२ रेंटल ट्रान्सप्लांट (मृत रेंटल डोनर ट्रान्सप्लांट ४ व जिवंत रेंटल डोनर ट्रान्सप्लांट ८ ) केले. प्रा. दारिअस एफ मिर्झा यांनी मुंबई व नवीमुंबई, इंदोर, नाशिक येथील १८ अवयव दात्यांचा गौरव केला.
अवयवदानाची गरज स्पष्ट करत, नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सचे एचपीबी व ट्रान्सप्लांट प्रमुख प्रा. दारिअस एफ मिर्झा म्हणाले, “अवयव निकामी होण्याच्या शेवटच्या टप्प्यात अनेक रुग्ण असतात व त्यांना अवयवांची गरज असते. अवयव दानाविषयी अजूनही लोकांमध्ये गैरसमज व अपुरी जागृती आहे. सपोर्ट ग्रुपच्या बैठकीमुळे अवयवदानाविषयी व जीवन वाचवण्यात योगदान देण्याविषयी माहिती देण्यात आली. दानाच्या प्रेरणदायी उदाहरणांनी याचे महत्त्व अधोरेखित केले. वडिलांकडून मुलीला, मुलाकडून वडिलांना, पत्नीकडून पतीला अशा कुटुंबातील बंधांच्या कथा समोर आल्याने समाजातील अधिकाधिक लोकांनी अवयवदानासाठी पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. गौरव समारंभानंतर आहार व्यवस्थापन, ट्रान्सप्लांटच्या आधी व नंतर रुग्णांनी काय करावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.