मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘सिटीझन जर्नलिस्ट’ या लोकप्रिय दैनिकाची ‘citizenjournalist4.com’ ही वेबसाइट आहे. विश्वासार्ह पत्रकारिता म्हणजे ‘‘सिटीझन जर्नलिस्ट’ अशी ओळख आहे. ‘आवाज जनहिताचा…’ हे या वृत्तपत्राचे घोषवाक्य आहे. गेल्या सात वर्षांमध्ये ‘‘सिटीझन जर्नलिस्ट’ने सामान्य वाचकांना केंद्रस्थानी ठेवून अनेक महत्त्वाच्या बातम्या, सखोल विश्लेषणे, विविध सदरे प्रसिद्ध केली जातात.
‘citizenjournalist4.com’ ही वेबसाइट याच ‘सिटीझन जर्नलिस्ट’शी निगडीत आहे. ‘citizenjournalist4.com’ ही वेगवेगळ्या स्वरुपाच्या बातम्या आणि लेख प्रसिद्ध करणारी परिपूर्ण वेबसाइट आहे. सध्या एका क्लिकमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडी क्षणार्धात आपल्याला कळतात. प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन असल्याने बातम्या तसेच इतर घडामोडींबाबत प्रत्येक जण अपडेट राहण्याचा प्रयत्न करतो. हे ध्यानी घेऊनच ‘citizenjournalist4.com’ ही वेबसाइट प्रत्येक बातमीची आणि घडामोडीची अपडेट देत असते. शहरापासून गावपाड्यापर्यंत अन् राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीयपर्यंतच्या घडामोडी, बातम्या, विश्लेषण या वेबसाइटवर एका क्लिकवर उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर, मनोरंजन, क्रीडा, लाइफस्टाइल, फोटो गॅलरी असे विभागही नेटिझन्सच्या आवडी-निवडी पुरवितात.
‘व्हिडीओ’ या विभागाद्वारे नानाविध घडामोडी व्हिडीओ स्वरुपात उपलब्ध असल्याने ही वेबसाइट केवळ वाचनीयच नाही, तर दृकश्राव्य स्वरुपतही प्रभावी झाली आहे. मल्टिमीडिया स्वरुपात या बातम्यांचे वार्तांकन करण्यात येते.
‘citizenjournalist4.com’ या वेबसाइटवर या सर्व बातम्या आणि लेख प्रसिद्ध करण्यासाठी अभ्यासू वार्ताहर आणि उपसंपादकांची टीम आमच्याकडे कार्यरत आहे. त्याचबरोबर मल्टिमीडिया स्वरुपात बातम्या उपलब्ध करून देण्यासाठी व्हिडीओ एडिटर्स, ग्राफिक डिझाइनर्स आणि कॅमेरामन हे सुद्धा दिवस-रात्र उपलब्ध आहेत.
अशा प्रकारे ताज्या घडामोडी आणि विविध लेख तुम्हाला ‘citizenjournalist4.com’ या वेबसाइटवर वाचताही येतात आणि पाहताही येतात. वर्षाचे 365 दिवस आणि 24 तास आम्ही तुमच्या सेवेत हजर आहोत.
तुम्ही आमचे फेसबुक पेज लाइक करून आणि ट्विटर हॅंडलसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो करून ताज्या घडामोडी बघू शकता.
https://www.facebook.com/Citizennewsmarathi