वय वर्षे ८ ….. ४४ सुवर्ण पदकाची मानकरी

डोंबिवलीच्या आर्याचे स्विमींगमध्ये सोनेरी यश 

डोंबिवली( संतोष गायकवाड ) : वयाच्या पाचव्या वर्षापासून स्विमिंगला सुरूवात करून, अवघ्या तीन वर्षात तिने तब्बल ४४ सुवर्ण पदक पटकावलेत. त्याबरोबरच प्रत्येक स्पर्धेत वैयक्तिक सन्मानचिन्ह आणि चॅम्पिअशिप मिळविण्याचा मानही तिने राखलाय. आर्या प्रवीण गडे असे त्या डोंबिवलीकर सुवर्ण कन्येचं नाव आहे. डोंबिवली जिमखाना आयोजित सदस्य स्विमिंग स्पर्धेत मागील २ वर्षात आर्याने १० सुवर्णपदक पटकावले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या उत्सव कार्यक्रमात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आर्याचा सन्मान करण्यात आला.


डोंबिवलीतील ओंकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आर्या शिकत आहे. लहानपणापासून तिला स्विमिंगची आवड असल्याने वडील प्रवीण गडे यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच तिला स्विमिंगचे प्रिशिक्षण दिले. डोंबिवली जिमखाना येथील तरण तलावात आर्या स्विमींगचा सराव करते. स्थानिक पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत झालेल्या प्रत्येक स्पर्धेत आर्याने आपला ठसा उमटवलाय. आतापर्यंत आर्याने ४४ सुवर्णपदकाबरोरच २० रजत पदक, ३ कास्य आणि १७ वैयिक्तिक सन्मानचिन्ह आणि १७ चॅम्पिअन शिप ट्रॅाफी पटकावलीय. २०१० ला पार पडलेल्या ५ वी अॅम्युअल स्विम गाला स्पर्धेत ३ सुवर्णपदक आणि २ रजत पदक तर आयआयटी मुंबई राज्यस्तरीय ओपन स्वीम गाला १ कास्य पदक, ठाणे जिल्हा लोअर एन ग्रुप अॅक्वाटिक चॅम्पियनशिप २ सुवर्ण आणि ३ रजत पदक, कै तुकाराम आखाडे मेमोरेबल स्विमिंग चॅम्पिअनशिप स्टारफिश वेल्फेअर असोसिएशन १ सुवर्ण आणि ३ रजतपदक तर नेरूळ येथे झालेल्या जिल्हा स्तरीय जलतरण स्पर्धा २ रजत २ कास्यपदक पटकावलयं. डोंबिवली जिमखाना येथे पडलेल्या १९ जिल्हास्तरीय अॅक्वाटिक चॅम्पिअनशिप- मध्ये ३ सुवर्णपदक आणि १ रजतपदक, ३ अॅन्युअल स्विम गाला फादर अॅजेल मल्टी पर्पज स्कूल व ज्युनिअर कॉलेज ३ सुवर्णपदक आणि १ रौप्य पदक , ठाणे जिल्हा अॅमेच्युअर अॅक्वाटिक असोसिएशन सब ज्युनिअर व ज्युनिअर चॅम्पिअनशिप स्पर्धेत ४ सुवर्णपदक, नेरूळ जिमखाना येथील जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत ३ सुवर्णपदक आणि १ रजतपदक पटकावलंय. नवी मुंबई महापालिका महापौर चषक स्पर्धेत तिने ४ सुवर्णपदक आणि १ रजत पदक पटाकावल. द बॉम्बे वायएमसीए इंटरस्कूल स्विमींग चॅम्पियनशिप स्पर्धेत ५ सुवर्णपदक, डोंबिवली जिमखाना येथे पार पडलेल्या २१ वी जिल्हास्तरीय अॅक्वाटिक चॅम्पिअनशिप स्पर्धेत ३ सुवर्णपदक आणि १ रजत पदक पटकावलं. लहान वयातच आर्याने स्विमिंग क्षेत्रात चांगलीच झेप घेतल्याने तिचे सर्वच कौतूक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *