कचरा मुक्तीसाठी आयुक्तांचे पाऊल …
कल्याण  ; कल्याणातील जागरूक नागरिक श्रीनिवास घाणेकर यांनी इमारतीच्या टेरेसवर केलेल्या मातीविरहीत बागेस तसेच त्या अनुषंगाने कंपोस्ट बनवण्याच्या नाविन्यपुर्ण प्रयोगास आज केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी भेट दिली.आधारवाडी कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आयुक्तांनी पाऊल उचलले.
आधारवाडी डंपिंग ग्राउंडवर असलेल्या कचऱ्याच्या ढिगाचे कंपोस्टमध्ये किंवा शून्य कचरा पद्धतीने कसे निवारण करता येईल या संदर्भात आयुक्तांनी घाणेकर यांच्याकडून माहिती घेतली.  या सर्व कचऱ्याचे विघटन जवळपास मोफत स्वरूपात करण्याचा पथदर्शक प्रकल्प तातडीनी सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यावेळी आयुक्तांसोबत उप आयुक्त सुरेश पवार व सहाय्यक आयुक्त नितीन नार्वेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *