पत्नीवर अत्याचार करणा-या पोलीस अधिकाऱ्यास न्यायालयाची चपराक
मुंबई : पत्नीचा मानसिक शारिरीक छळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला मुलूड न्यायालयाने चांगलीच चपराक लगावलीय. हा पोलीस अधिकारी कुर्ला पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत
मुलुंड येथील पोलीस कॉलनीत हे कुटूंब राहते. लग्नाच्या दोन महिन्यानंतर पतीने आपल्याला हुंड्यासाठी शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केलाय. पतीने बांद्रा कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. पतीच्या वाढत्या त्रासाला कंटाळून त्याच्या पत्नीने मुलुंड न्यायालयात अॅडव्होकेट प्रदीप बावस्कर व अनिरुद्ध कुलकर्णी यांच्या मदतीने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत दावा दाखल केला. दाव्याच्या सुनावणीत पत्नीच्या पालनपोषणासाठी दर महिन्याला पत्नीस पंधरा हजार व मुलांना प्रत्येकी अडीच हजार रुपये द्यावेत तसेच पत्नीवर कोणताही अत्याचार करू नये असा आदेश न्यायालयाकडून देण्यात आलाय अशी माहिती अॅडवोकेट प्रदीप बावसकर यांनी दिली.