माथेरानमध्ये घोड्यावर बस्तानाही हेल्मेट सक्ती करा !

 घोड्यावरून खाली पडल्याने ९ वर्षाची चिमुरडी गंभीर जखमी

 माथेरान (राहुल देशमुख ) :  माथेरानमध्ये घोड्यावरून खाली पडून पर्यटक जखमी झाल्याच्या अनेक घटना घडल्या असतानाच शनिवारी माथेरान मध्ये कुटुंबासह फिरावयास आलेल्या मुंबई येथील हसन रेडीवाला यांची नऊ वर्षांच्या मुलगी सरीना हिचा घोड्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्याचा प्रकार घडलाय. तिच्या डोक्याला दुखापत झाल्याने तिला पुढील उपचारांसाठी मुंबई येथील सैफी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.  त्यामुळे घोड्यावर बसताना हेल्मेट सक्ती करावी  अशी मागणी पर्यटकांकडून जोर धरू लागलीय.

सध्या प्रचंड उकाडा वाढलाय. मुंबई पासून जवळ अंतरावरील थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरानला पर्यटकांची गर्दी होते. शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी मुंबई येथील हसन रेडीवाला याचे कुुटुंब फिरण्यासाठी आले होते. शनिवारी सरीना ही घोड्यावर रपेट मारण्यासाठी बसली. मात्र तिचा घोड्यावरून तोल गेल्यामुळे घोडा बिथरला आणि सुसाट पळत जाताना या मुलीचा पाय घोड्याच्या रिकीबीत अडकल्याने ती काही अंतर तांबड्या मातीच्या खडबडीत रस्त्यातून फरफटत गेल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला तातडीने नगरपालिकेच्या दवाखान्यात प्राथमिक उपचारांसाठी दाखल केले. परंतु डोक्याला गंभीर मार लागल्याने तिच्या डोक्यावर तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी करून तिला पुढील उपचारांसाठी मुंबई येथील सैफी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

अनेकदा घोड्यावरून पडुन गंभीर जखमी होणे.तसेच वेळप्रसंगी पर्यटकांना आपल्या प्राणांसी मुकावे लागत आहे.काही वेळा तीन ते चार घोडयांच्या सोबत एकच व्यक्ति अथवा घोडेवाला पॉईंटस् ची सैर करण्यासाठी जात असल्याने एखादे वेळी जंगलात काही आवाज झाल्यास घोड़े बिथरतात त्यामुळे ते सैरवैर धावत सुटतात.त्यामुळे नवख्या पर्यटकांना घोड्यावर बसण्याची सवय नसल्यामुळे अंदाज येत नाही.आणि त्यांचा तोल जाऊन ते खाली कोसळतात. या कारणांमुळे इथे अपघात होण्याच्या घटनांची दरवर्षी मालिका सुरू असते याकामी नगरपालिकेने अथवा घोडेवाल्यांच्या संघटनेने असे जीवघेण्या अपघातापासून पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हेल्मेट दिल्यास होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण राखता येईल.त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन पासून बाजारपेठेच्या ठिकाणी रस्त्यांच्या बाजूलाच घोड़े उभे केलेले असतात त्यामुळे पर्यटकांना तसेच पादचार्यांना मार्गक्रमण करतांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.घोड्यांनी लाथा मारून आजवर अनेकांना गंभीर जखमी तर काहींना कायमस्वरूपी अधु केलेले आहे. यालाच आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने डोळेझांक करू नये.दिवसारात्री पोलिसांनी मुख्य बाजारपेठांतील भागात गस्त घालणे सुद्धा गरजेचे बनलेले आहे. घोड्यांना एखादा सुयोग्य स्टॅण्ड दिल्याशिवाय अपघात होणार नाहीत.कारण घोडा हे माथेरानचे प्रमुख आकर्षण असून हौशी वाहन आहे.असे खुद्द पर्यटकांमधून बोलले जात आहे.

**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!