रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन १६ मार्चला नवी दिल्लीत
मुंबई – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए ) चे राष्ट्रीय अधिवेशन शुक्रवार दि 16 मार्च रोजी नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उदघाटन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या अधिवेशनास केन्द्रिय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस राम लाल, केंद्रियमंत्री रामविलास पासवान, केंद्रियमंत्री थावरचंद गेहलोत, केंद्रिय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रिपाइं चे राष्ट्रीय अधिवेशन केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षेत पार पाडणार आहे अशी माहिती रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलीय.
दोन सत्रात हे अधिवेशन होणार आहे. सकाळी 10 ते 12 राष्ट्रीय कार्यकारिणी ची बैठक असून त्यानंतर दुपारी 1 वाजता खुले अधिवेशनाचे उदघाटन होणार आहे. या अधिवेशनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एन डी ए सरकारने केलेल्या चांगल्या कामगिरीचे अभिनंदन करणारा ठराव या अधिवेशनात मंजूर करण्यात येणार आहे. अधिवेशनात रिपाइंची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी निवडण्यात येणार असल्याची माहिती महातेकर यांनी दिली आहे.