अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ व्हावी – खासदार रक्षा खडसे
मुंबई (अजय निक्ते ) : देशातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ व्हावी अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेत केली.
देशातील २४ लाख अंगणवाडी सेवक तथा अंगणवाडी सहाय्यक ग्रामीण व आदिवासी बहुल क्षेत्रात महिला व बाल विकास मंत्रालयाशी संलग्न एकात्मिक बाल विकास योजनेच्या अंतर्गत सेवा देत आहेत. त्यांना मिळणारे मानधनात वाढ व्हावी तसेच इतर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ जसे वैदयकीय रजा, पगारी रजा व पेन्शन या सुविधा मिळाव्यात, तसेच ३ ते ६ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी पूरक आहार खर्च, ड्युटी ड्रेस कोड मटेरियल खर्च, अंगणवाडी केंद्रांना मिळणारा प्रासंगिक निधी अशा खर्चात वाढ करून मिळावी यासाठी अनेक वेळा शासनाकडे मागणी केली आहे व त्यासाठी प्रदर्शने केली आहेत. जेणेकरून या अंगणवाडी सेविकांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या व वाढणाऱ्या महागाईचा सामना त्या अधिक प्रभावीपणाने करू शकतील.
आज देश डिजीटलायजेशनकडे वाटचाल करत आहे. अशा काळात या अंगणवाडी सेविकांना संगणक प्रशिक्षण देण्याची गरज आहे.यासाठी लोकसभेच्या माध्यमातून खासदार रक्षा खडसे यांनी या अंगणवाडी सेविकांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी मागणी केली व या अंगणवाडी सेविकांना त्यांची रिपोर्टिंग अधिकारी वर्गाला जलद रीतीने करण्यासाठी लॅपटॉप किंवा टॅबलेट देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
अंगणवाडी सेवीकाचे मानधन वाढले पाहिजे