ज्ञानदीप विद्यामंदिर मुंब्रा शाळेचा सोलर मोबाईल चार्जर (स्मार्ट हेल्मेट) प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड
डोंबिवली ( शंकर जाधव ) ; समीर ज्ञानप्रसारक विश्वस्त निधी संचलित ज्ञानदीप विद्यामंदिर मुंब्रा शाळेने ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम या विषयावर सन २०१७-१८ अंतर्गत सोलर मोबाईल चार्जर (स्मार्ट हेल्मेट) ह्या पकल्पाची जिल्हास्तरीय प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक प्राप्त करुन राज्यस्तरासाठी निवड करण्यात आली आहे.
शहरातील समस्येवर नाविन्यपूर्ण व कल्पकतेने संशोधन करुन सदर प्रकल्पाची मांडणी केली, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा वाढावा यासाठी शाळा दरवर्षी विज्ञान प्रदर्शनमध्ये सहभाग नोंदविते, यापूर्वीही शाळेचे भ्रमणध्वनीवरुन जलसंवर्धन व जलसिंचन ह्या प्रकल्पाची (राज्यस्तरावर) व पुर्नवापर उर्जेची निर्मिती ह्या प्रकल्पाची (राष्ट्रस्तरावर) दिल्ली येथे मांडणी करण्यात आली होती, या उपकमात व पकल्पात शाळेच्या विद्यार्थ्यांनी बक्षिसे मिळवली आहेत.
या नेत्रदीपक यशाबद्दल प्रकल्पाचे यशस्वी सादरीकरण करणा-या इ. ६ वीच्या विद्यार्थ्यांना कु. ईश्वरी वि. पाटील व प्रभात दास, तसेच मार्गदर्शन करणारे शिक्षक हेमंत नेहते, विज्ञान शिक्षक नंदकिशोर चौधरी संगीता बागल ह्यांना शाळेचे अध्यक्ष सतिश देसाई, सेकेटरी समीर देसाई सदस्या शिवानी व प्रविणा, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उषा शिंदे, माध्यमिकचे मुख्याध्यापक वासुदेव ब-हाटे, इंग्रजी माध्यमाच्या सुपरवाझर पूर्वा गुजर या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.